माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह २० नगरसेवकांची राष्ट्रवादीला सोडचिठी

मालेगावातील माजी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी ट्रिपल तलाकच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीच्या गैरहजेरीमुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मालेगाव महापालिकेत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व २० नगरसेवक माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी त्यांनी येणार्या विधानसभा निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवणार याबाबत बोलणे टाळले.
या पक्ष सोडून गेलेल्या माजी आमदार, माजी महापौर यांच्यासह राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेल्या मालेगाव महापलिकेच्या २० नगरसेवकांचाही यात समावेश आहे. राष्ट्रवादीचे मालेगाव महानगर अध्यक्ष मालेगाव मध्यचे माजी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी पक्षाला सोडचिठी दिल्याने मालेगाव शहर राष्ट्रवादीस मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.