Current News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या …मुंबईत लोकांची दैना , आगामी २४ तासांत मुसळधार पाऊस; वेधशाळेचा अंदाज

उन्नाव बलात्कार प्रकरणः दिल्लीतील तीस हजारी न्यायालयात सीबीआयकडून आरोपपत्र दाखल
अहमदनगर: मनपा अभियंत्यावर बूट फेकल्याच्या प्रकरणात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना जिल्हा न्यायालयातून जामीन मंजूर
मुंबईः अभिनेते श्रीराम कोल्हटकर यांचे निधन
नाशिकः सायखेडा येथील गोदावरी नदीवरील पूल पाण्याची वाढणारी पातळी बघता वाहतुकीस बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे प्रशासनाकडून आवाहन
आसामः गुवाहाटी येथील श्वेता अग्रवाल हत्येप्रकरणातील आरोपी गोविंद सिंहल याला फाशी; तर कमला देवी आणि भवानी सिंहल यांना जन्मठेप
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात आगामी २४ तासांत मुसळधार पाऊस; वेधशाळेचा अंदाज
नागपूरः महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे
भंडाराः प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ.
मुंबईः टिळक नगर आणि चेंबूर स्थानकादरम्यान पुलाचा काही भाग रुळावर कोसळल्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक बंद
पुणेः पाण्याखाली गेल्याने भिडे पुलावरील वाहतूक बंद
मुंबईः मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प, सायन रेल्वे रुळावर पाणी. प्रवाशांना मनस्ताप.
पालघरः हमरापूर ते गलतारे रस्ता खचल्याने तसेच पूर आल्याने सहलीला आलेले मुंबईतील ७० विद्यार्थ अडकले.
पवना धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून त्याद्वारे ४२०० क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून १४०० क्युसेक असा ५६०० पाण्याचा विसर्ग पवना नदीच्या पात्रात सोडण्यात आला.
मुंबई: भांडुप येथील श्रीराम कॉलेजच्या इमारतीत शिरले पाणी
मुंबईः कल्याणकडे जाणाऱ्या जलद मार्गावरील वाहतूक ठप्प.
मुंबईः कुर्ला-वडाळा रेल्वे रुळ पाण्याखाली हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प.
मुंबई: हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड.
गुजरातमधील बडोदा शहरात पावसाचा हाहाकार. जनजीवन विस्कळीत.
पालघर: डहाणू तालुक्यातील कासा-वरोती येथील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात चार गुरे नदीच्या प्रवाहात गेली.
पुणेः आजारी पत्नीचा खून करून आत्महत्या करण्याची चिठ्ठी लिहून पसार झालेल्या व्यक्तीला वानवडी पोलिसांकडून अटक
अहमदनगर: नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेला विसर्ग वाढवला. सध्या या बंधाऱ्यातून ८३ हजार ७७३ क्यूसेस वेगाने विसर्ग सुरू
मुंबईः एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार; ‘चालक-वाहक’म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड