Aurangabad : रेल्वेच्या धडकेने अज्ञात महिला जागीच ठार, पोलिसांचे ओळख पटविण्याचे आवाहन

आज दूपारी १३.४५ वाजता जालनाकडून औरंगाबादकडे जाणारी रेल्वे संचखंड एक्सप्रेस समोर संग्रामनगर रेल्वेगेट क्र ५४ ब च्या पश्चिमेस अंदाजे २५० फूटावर रेल्वे फुल क्र १३१व ११५/६ ( माईलस्टोन ) कि.मी. दगडाजवक एक अंदाजे ४५ वर्षा महिलेस धडक लागल्याने जागीच मयत झाली.सदर महिलेचा मृतदेह घाटी रुग्णलयात असून पोलिसांनी ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हि घटना घडताच विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी घटनेची माहिती ऊस्मानपुरा पो.स्टे. चे पो.नि. दिलीप तारे यांना कळविण्यात आली. आली सदर महिला रेल्वेच्या उत्तरेस ५ फुुटावर मृतदेह पुर्व पश्चिम पडला असून तिच्या ( पुर्व ) पायाच्या१० फुटावर काळा रंगाची छोटी पर्स सांपडली असुन त्यात एक मोठी चावी व पैसे होते. पर्सच्या दोन फुटावर एक चावीचा गुच्छ मिळाला. माहिलेच्या ऊजव्या मनगटावर गोंधलेले ५ टिपके गोलाकार आकारात होते.
मृतदेह हलविणे व नविन कपडे घालणे ( साडी बदलणे व झाकणे ) याकामी पीएसआय श्रीमती क.ेएस.निर्मल, एलपीसी श्रीमती अनिता ऊपाध्ये ,पोकॉ शिवाजी गाढे , पोकॉ शहादेव पालवे पोकॉ दत्ता डूबुकवाड विशेष पोलीस अधिकारी जाबीर पठाण विनोद खरात, नितिन वाहुळ ओंकार ग्रूपचे राहुल सोनकांबळे, कैलास भातकुडे, वामनराव कुलकर्णी यानी मदत केली.