इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या ….अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१९

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख १ महिन्यांनी वाढवलीय. आता ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत तुम्ही ITR भरू शकता. तुम्ही रिटर्न फाॅर्ममध्ये लाॅग इन केलं तर एक्सेल शीटमध्ये बरीच माहिती पहिल्यांदाच भरलेली पाहायला मिळते. पण ती नीट तपासून पाहणं गरजेचं आहे.
रिटर्नमध्ये पहिल्यांदाच जी माहिती भरलेली असते, तिला Pre-Filled ITR म्हणतात. सरकार आधीही प्री फिल्ड माहिती देत आलीय. त्यात बँक खात्याचा नंबर, वडिलांचं नाव, रिटर्न फाइल करणाऱ्याचं नाव आणि आधार नंबर.
यावेळी मिळकतीची पूर्ण माहिती फाॅर्ममध्ये दिसेल. म्हणजे HRA, अलाउन्स व्हॅल्यू, कर सवलतीची माहिती यात असेल. एप्लाॅयरनं कापलेल्या टॅक्सची माहिती असेल. घर मालमत्ता ते भाड्यातून मिळणारी रक्कम यावरच्या TDSबद्दलही यात असेल. ITR मध्ये लिहिलेल्या सर्व गोष्टींची तपासणी नीट करणं आवश्यक आहे. एम्प्लाॅयरद्वारे कर सवलत क्लेम केलेली नसेल तर ती नंतर घेता येते. फाॅर्म 16मध्ये असलेले तपशीलही नीट पाहणं गरजेचं आहे.
ITR भरल्यानंतर युजर्सनी तो व्हेरिफाय करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही फाॅर्म व्हेरिफाय केला नाही, तर इन्कम टॅक्स नियमांप्रमाणे तो वैध मानला जात नाही. व्हेरिफाय करण्यासाठी OTP येतो. त्यासाठी तुमचा फोन नंबर आधार कार्डाशी जोडला असला पाहिजे. OTP इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या वेबसाइटवर टाकला की तुमचा रिटर्न व्हेरिफाय होईल. याशिवाय तुम्ही बँक एटीएम, बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट आणि नेट बँकिंगद्वारे तुम्ही ITR व्हेरिफाय करू शकता.