News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

औरंगाबाद: शिक्षकाच्या डोक्यात दगड घालून खून करून त्याच्याकडील रोख रक्कम, सोनसाखळी व मोबाइल लांबवल्याप्रकरणातील आरोपी राजू संतदिन गौतम उर्फ सोन्या बिहारी याला दोन वर्षांनी तपोवन एक्सप्रेसमधून अटक
उत्तर प्रदेशः वीजेची उच्च दाब असलेली तार पडल्यामुळे महराजगंज येथे ६ जणांचा मृत्यू
औरंगाबाद: जालना येथेच बहुप्रतिक्षित ३६५ खाटांचे प्रादेशिक मनोरुग्णालय उभे राहणार असून, त्यासाठी दहा एकर जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर; याच रुग्णालयासाठी २६३ पदांचा प्रस्ताव
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कमवा व शिका योजनेत बोगस विद्यार्थी दाखवून साडेतीन लाख रूपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणात चतुःश्रुंगी पोलिसांकडून एकाला अटक
दिल्ली : तीन तलाक आणि अन्य महत्त्वाच्या विधेयकांसाठी लोकसभा, राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी भाजप खासदारांना व्हीप जारी
अहमदनगर: शाळेतील मुलांशी विकृत चाळे करणाऱ्या शिक्षकाला तीन वर्षे कैद आणि १० हजार रुपये दंड; संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
खेड: जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
पुणेः राज्याचा मुख्यमंत्री भाजप, शिवसेना, आरपीआय, रासप, शिवसंग्राम, रयत संघटना अशा सर्वांच्या महायुतीचा होणार असून, अब की बार २२० के पार आमदार निवडून येतील; भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना विश्वास
अहमदनगर: गोदावरी, भीमा नदीची पाणीपातळी वाढत असल्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना जिल्हा प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
नागपूर: एमबीबीएस कोर्सच्या ईडब्ल्यूएस १० टक्के कोट्यासाठी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचे एमसीआयला आदेश; राज्य सरकारचे हायकोर्टात शपथपत्र
नाशिकः गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
जम्मू काश्मीरः भाजपाच्या कोअर ग्रुपची आज सायंकाळी ७ वाजता बैठक