Kopargao : गोदाकाठच्या नागरिकांना कोपरगाव पालिकेचा इशारा , नांदूर -मधमेश्वर धरणातून सोडले पाणी

गोदावरी नदीपात्रात नांदूर-मधमेश्वर धरणातून 54 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. तसेच पाऊस चालू असल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन कोपरगाव नगरपालिकेने गोदावरीच्या काठावर असलेल्या गावातील नागरिकांना सावधानतेचा आणि सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी दक्ष राहून काळजी घेण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.