लज्जास्पद : दारुड्या सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार

सून आणि सासऱ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे. ५० वर्षांच्या सासऱ्यानं आपल्याच मुलाच्या पत्नीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेनं नराधम सासऱ्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हिमाचल प्रदेशातील नालागडमधील रामशहर परिसरातील ही धक्कादायक घटना आहे. ‘सासरे दारूच्या नशेत घरी आले आणि त्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली. मी यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी बळाचा वापर करत मला खोलीत फरफटत नेलं आणि माझ्यावर अत्याचार केले’,अशी आपबीती पीडित महिलेनं पोलिसांना सांगितली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,’घडलेल्या गुन्ह्याची कसून चौकशी सुरू आहे. पीडित महिलेच्या काही वैद्यकिय तपासण्या केल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस लवकरच आरोपीला अटक करून पुढील चौकशी सुरू करणार आहेत’.