Karnatak Political Drama : आज येडियुरप्पांची बहुमताची परीक्षा , १०० टक्के पास होण्याचा दावा

कर्नाटक विधानसभेत उद्या, सोमवारी १०० टक्के बहुमत सिद्ध करून दाखवणारच, असा ठाम विश्वास नवनिर्वाचित मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पांनी व्यक्त केला. याशिवाय तत्कालीन जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारने तयार केलेले अर्थ विधेयक कोणताही बदल न करता विधानसभेत मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कर्नाटकचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री येडियुरप्पा उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर त्यांनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मी उद्या विधानसभेत १०० टक्के बहुमत सिद्ध करून दाखवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच तत्कालीन आघाडी सरकारनं जे अर्थ विधेयक तयार केलं आहे. कोणताही बदल न करता ते विधेयक विधानसभेत मांडण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, कर्नाटकच्या राज्यपालांनी शुक्रवारी राजभवनमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. विधानसभेत सोमवारी बहुमत सिद्ध करणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.