News Updates Live : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

मुंबई आणि उप नगरात पावसाची तुफान बॅटिंग , अंबरनाथ , डोंबिवली स्टेशन परिसर पाण्याखाली. बदलापूर लोकल कल्याण स्थानकात रद्द .प्लॅटफॉर्मवर पाणी साचल्याने प्रवाशांची गैरसोय
मुंबईः पावसामुळे १७ विमानांचा मार्ग बदलला. मुंबईत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येणारी विमाने अन्यत्र वळवली.
नवी मुंबईः सायन पनवेल मार्गावरील सानपाडा ते नेरूळ हायवेवर ३ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी. अनेक ठिकाणी पाणी साचले.
मुंबईः मुसळधार पावसामुळे ईस्टर्न एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी.
मुंबईः मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे बंद.
मॉब लिंचिंगः न्यायालयाच्या निर्देशाचे पालन न केल्याने सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस
धनगर आरक्षण मेळाव्यासाठी प्रियांका गांधी आणि शरद पवार पंढरपुरात येणार
भिवंडीत महिलेच्या तक्रारीनंतर अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोना प्रतिबंध कायद्यानुसार पती, सासरा आणि अन्य एक नातेवाईक अशा तिघांविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नागपूरवरून बेंगळुरुकडे निघालेल्या संघमित्रा एक्सप्रेसचे इंजिन कपलिंग तुटल्यामुळे गाडीपासून वेगळे झाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडली १.२४ कोटी रुपयांची रोख.
रत्नागिरीः जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पावसामुळे बंद करण्याचा निर्णय
वादग्रस्त विधानप्रकरणी खासदार आझम खान यांनी माफी मागावी अन्यथा कारवाईला सामोरे जावेः लोकसभा सभापती.
सांगलीत रुग्णाकडून ३० रुपयांची लाच घेताना डॉक्टरला अटक.
ईव्हीएम विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोर्चेबांधणी. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गुरुवारी भेट घेणार.
ठाणे: पाचवीतील विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या नवी मुंबईतील खासगी क्लासचालक प्रशांत त्रिपाठीला सात वर्षाचा कारावास. ठाणे न्यायालयाचा निर्णय