Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे महाराष्ट्रात ‘भाजप भगाव संविधान बचाव’ अभियान : लक्ष्मण माने

Spread the love

महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी पक्षाच्या प्रदेश अध्यक्षपदी हाजी इमतियाज पिरजादे यांची तर पश्चिम महाराष्ट्र पक्ष प्रवक्ता म्हणून ‘ पडद्याआड ’पुस्तकाचे लेखक साथी जसराज रजपूत यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण मानेयांनी केली.तसेच पक्षातर्फे लवकरच ‘भाजप भगाव संविधान बचाव’ अभियान सुरू केले जाणार असल्याचे शनिवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
माने म्हणाले, येत्या सोमवारी (दि.२९) बालगंधर्व रंगमंदीर येथे पक्षाचे स्थापना अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे हा कार्यक्रम रद्द करून पुढे ढकलण्यात आला आहे. पक्षाच्या वाटचालीच्या दृष्टीने अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, औरंगाबाद, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी ‘भाजप भगाव संविधान बचाव’ अनियान पोहचविले जाणार आहे.
पुण्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीच्या बैठकीस पक्षाचे उपाध्यक्ष मच्छिंद्र जाधव,खजिनदार हरिदास जाधव,सरचिटणीस प्रेमचंद्र साबळे तसेच डॅनियल खुडे आदी उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!