महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवले , खराब हवामानामुळे नौदल व हवाईदलाचे हेलिकॉप्टर घटनास्थळावरून परतले

पावसामुळे मदतकार्यात अडथळा, महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांची सुटका करण्यासाठी वॉटरप्रूफ इंजिनची मदत
बदलापूर आणि वांगणी दरम्यान पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून, आतापर्यंत एक हजार प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. प्रवाशांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक हजार प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले आहे. या प्रवाशांना बदलापूर येथे नेण्यात येणार असून, तेथून त्यांना त्यांच्या घरांकडे रवाना करता येईल. ज्या प्रवाशांना कोल्हापूरला जायचे आहे, अशा प्रवाशांसाठी कल्याण येथून विशेष ट्रेन सुटणार आहे.
मुंबईत पुढचे दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे, गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहनही मुंबई हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलं आहे. मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अख्ख्या मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत पुढचे दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुंबई पोलिसांकडून सोबतच हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे. तसंच, आयएमडी म्हणजे मुंबई हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पुढचे चोवीस तास आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.