भिवंडीचे सात ते आठ गोदामे आगीत भस्मसात

Maharashtra: A fire broke out in a chemical godown in Bhiwandi, Thane, earlier today. Fire fighting operations are still underway. pic.twitter.com/iwx6KcqaKk
— ANI (@ANI) July 23, 2019
भिवंडीच्या दापोडा येथील एका केमिकल गोदामाला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागून सात ते आठ गोदामे आगीत भस्मसात झाली आहेत. आग विझविण्यासाठी भिवंडी, कल्याण, ठाणे, उल्हासनगर एमआयडीसीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत आतापर्यंत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही मात्र, मोठय़ा प्रमाणावर वित्त हानी झाली आहे. आग अजूनही धुमसत असून या आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मागील महिन्यातही या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली होती.