पाच सुवर्ण मिळवणारी सुवर्ण मिळवणारी , सुवर्ण कन्या हिम दासचे राष्ट्रपती , पंतप्रधानांकडून अभिनंदन

गेल्या १५ दिवसांत तब्बल पाच सुवर्णपदकांची पटकावणाऱ्या भारताची अव्वल धावपटू हिमा दासचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी अभिनंदन केले आहे. तीन आठवड्यात पाचवं सुवर्णपदक पटकावल्याबद्दल हिमा दासचं अभिनंदन. आपल्याला भरभरून यश लाभो. अशीच कामगिरी आगमी ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्याकडून होवो, असे ट्विट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे.
भारताची अव्वल धावपटू हिमाच्या गेल्या काही दिवसांतील कामगिरीबद्दल अभिमान वाटत आहे. संपूर्ण देश हिमाच्या कामगिरीमुळे आनंदित आहे. हिमाचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
गेल्या १९ दिवसांपासून ज्या पद्धतीने हिमाने युरोपियन देशांत कामगिरी केली आहे, ती स्तूस्त्य आहे. पाच सुवर्णपदक पटकावल्याबद्दल आपले अभिनंदन आणि आगामी स्पर्धांसाठी शुभेच्छा, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.