Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दोन वनरक्षक दुचाकीसह वाहून गेले,एकाचा मृतदेह सापडला तर दुसऱ्याचा शोध सुरू

Spread the love

कन्नड तालुक्यातील पिशोर परिसरात भारंबा नजीक असलेल्या कोळबी नदीवरून वाहणाऱ्या पुरात दोन वनविभागाचे कर्मचारी वाहून गेले. त्यात एकाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे. भारबा जैतखेडा भागात कार्यरत असलेले वन कर्मचारी हे रात्री पावसात पिशोरकडे जात होते. दरम्यान कोळंबी नदीवरील पुल पार करत असताना पुलावरुन वाहणाऱ्या पाण्याच्या वेगामुळे दोघेही दुचाकीसह वाहून गेले. दरम्यान रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन दोघे सापडले नाही. त्यामुळे रविवारी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सकाळी 11 वाजेच्या दरम्यान भारबा-पिशोर रोडपासून एक किलोमीटर अंतरावर राहुल दामोदर जाधव (वय 30) रा.सिंदखेडराजा यांचा मृतदेह आढळून आला. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!