Aurangabad Crime : मोबाईल टाॅवरच्या बॅटर्या चोरणार्या आंतरराज्यीय टोळीतील दोघे मुद्देमालासह अटकेत

औरंगाबाद – मोबाईल टाॅवरच्या १ लाख ८१ हजाराच्या बॅटर्या चोरणार्या टोळीतील दोन आंतरराज्यीय दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी बेड्या ठोकल्या.
रिजवान शहानाजुद्दीन शेख(२६) , जलाल्लूद्दीन बीरबल (२२) दोघेही राहणार कमरुद्दीन नगर जि.मेरठ उत्तर प्रदेश अशी अटक आरोपींची नावे आहेत. या चोरट्यांनी पैठण, बिडकीन, औरंगाबाद , जालना, बीड, अहमदनगर, जळगाव या ठिकाणाहून बॅटर्या चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी ५३ बॅटर्या जप्त केल्या आहेत. वरील दरोडेखोर बॅटर्या चोरल्यानंतर साजापूरच्या महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट मार्फत दिल्ली व उत्तर प्रदेशात पाठवंत होते. असे पोलिसांच्या तपासात उघंड झाले आहे.
वरील कारवाई पोलिस निरीक्षक भागवत फुंदे, पीएसआय भगतसिंग दुलत,पोलिस कर्मचारी सय्यद जियाभाई, विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे यांनी पार पाडली.