मोठी बातमी : अखेर डॉ . पायल तडवीने लिहिलेली चार पानांची “सुसाईड नोट”गुन्हे शाखेला मोबाईल मध्ये सापडली !!

अखेर डॉ . पायल तडवीने लिहिलेली चार पानांची मोबाईलमध्ये सेव्ह केलेली सुसाईड नोट सापडली असल्याने गुन्हे शाखेला हि सुसाईड नोट शोधण्यात मोठे यश मिळाले आहे. या सुसाईड नोटमध्ये पायलने डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. हेमा आहुजा या तिघींच्या नावाचा उल्लेख करून या तिघी आत्महत्येला कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. तसेच या तिघींच्या जाचाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे पायलने सुसाईड नोटमध्ये म्हटले असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेत असलेल्या या तिघी डॉक्टरांना अद्याप जामीन मिळालेला नसून या गुन्ह्याचे आरोपपत्र पुढील आठवड्यात विशेष सत्र न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
डॉ. पायल तडवीने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत तिच्या मृत्यूला तिन्ही वरिष्ठ महिला डॉक्टरच कारणीभूत असल्याचे तिने नमूद केले आहे. ‘या तिघींच्या जाचाला कंटाळूनच मी हे पाऊल उचलत असल्याचे’ पायलने सुसाईड नोटमध्ये म्हटलं असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या गुन्हे शाखेला पायलने मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट तिच्या मोबाईलमध्ये सापडली असून ही सुसाईड नोट चार पानांची असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यात अटकेत असलेल्या डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. हेमा आहुजा या तिघी सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. या गुन्ह्याचे आरोपपत्र पुढील आठवड्यात न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
डॉ. पायल तडवी हिने नायर हॉस्पिटलच्या हॉस्टेलच्या खोलीत २२ मे रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी पायलने इंग्रजीमध्ये चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. आत्महत्येपूर्वी पायलने या सुसाईड नोटच्या चारही पानांचे स्वतःच्या मोबाईल फोनमध्ये फोटो काढून ठेवले होते. आग्रीपाडा पोलिसांना घटनास्थळी कुठलीही सुसाईड नोट सापडली नव्हती. परंतु पायलचा मोबाईल पोलिसांना सापडला होता. मात्र, मोबाईल फोनला लॉक असल्यामुळे हे लॉक उघडण्यासाठी आणि मोबाईल फोन तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला होता. फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून या मोबाईल मधील डाटा काढण्यात आला असता त्यात पायलने लिहिलेल्या सुसाईड नोटचे फोटो सापडले. हे सुसाईड नोटचे पुरावे तपास यंत्रणेला देण्यात आले असून तपास यंत्रणेने सुसाईड नोट मधील हस्ताक्षर तपासणीसाठी हस्ताक्षर तज्ज्ञाकडे पाठवले आहे.