Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Karnatak Drama: सभागृहाचे काम तहकूब, राज्यपालांचे पत्र, अध्यक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Spread the love

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारचं भविष्य काय असेल याचा निर्णय आज रात्रीपर्यंत लागण्याची शक्यता होती. आज दिवस संपेर्यंत सरकारच्या विश्वास दर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण करा, असे लेखी पत्र कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी अध्यक्ष रमेश कुमार यांना दिले. मात्र दुसरीकडे, सभागृहाचे आजचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यपालांच्या पत्राला अध्यक्षांनी उत्तर द्यावे आणि आजच विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावे या मागणीसाठी भाजप आमदार रात्रभर सभागृहातच धरणे आंदोलन करणार आहेत. विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा पुन्हा उद्या सकाळी ११ वाजल्यापासून विधानसभेत सुरु होणार आहे.

सुमारे दोन आठवडे सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. या दरम्यान, सदनात बंडखोर आमदारांसह १९ आमदार गैरहजर राहिले. राज्यपालांनी रमेश कुमार यांना लिहिले की, ‘विश्वासदर्शक ठराव यावेळी सभागृहाच्या विचाराधीन आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की ते सभागृहाच्या विश्वासास कायम पात्र राहतील.

आज दिवस संपेपर्यंत विश्वासदर्शक प्रस्तावावर मतदान घेण्याबाबत विचार करा.’ काँग्रेसने राज्यपालांच्या अशा हस्तक्षेपाबाबत आक्षेप घेतला आहे. ‘राज्यपालांनी संविधानानुसार सदनाच्या कामकाजात दखल द्यायला नको,’ असे काँग्रेसचे आमदार एच.के. पाटील म्हणाले.

राज्यपालांचा संदेश स्वत: रमेश कुमार यांनी सभागृहात वाचून दाखवला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!