Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Karnatak Political Drama : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे कुमारस्वामी यांच्या समोरील अडचणीत वाढ , मात्र अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार

Advertisements
Advertisements
Spread the love

कर्नाटकात उद्या  नियोजित विश्वासदर्शक ठरावासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले असून  या सूचनेनुसार  विश्वासदर्शक ठरावासाठी बंडखोर १५ आमदारांवर उपस्थित राहण्याची सक्ती करता येणार नाही आणि उद्या सभागृहात उपस्थित राहायचे किंवा नाही, याबाबतचा निर्णय घेण्यास बंडखोर आमदार मोकळे असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले असल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

Advertisements

बंडखोर आमदारांचे वकील मुकुल रोहतगी यांनी सांगितले कि , कर्नाटकातील बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा, असा महत्त्वपूर्ण निकाल देत सुप्रीम कोर्टाने गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात निर्माण झालेली राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आहे मात्र  सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यापुढील अडचणी अधिक वाढल्या असल्याचे वृत्त आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रमेश कुमार आमदारांच्या राजीनाम्याप्रकरणी आपल्या मर्जीनुसार निर्णय घेऊ शकतात, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यासाठी कोणतीही कालमर्यादा देता येणार नसल्याचेही कोर्ट म्हणाले. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे उद्या कर्नाटक विधानसभेत होणाऱ्या मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारच्या शक्तिप्रदर्शात काय घडेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कुमारस्वामी  सरकारकडे बहुमत नसल्याने हे सरकार पडणार आहे, असे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केली आहे. कुमारस्वामी यांच्याकडे बहुमत नसेल, तर त्यांनी उद्या राजीनामा द्यायला हवा असेही ते म्हणाले. आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे ते म्हणाले. हा राज्यघटना आणि लोकशाहीचा विजय असून याबरोबच बंडखोर आमदारांचाही नैतिक विजय आहे, असेही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टाचा हा अंतरिम आदेश आहे. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबत पुढे सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल असेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!