Good News : कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला ICJची स्थगिती, भारताचा मोठा विजय

International Court of Justice verdict: A continued stay of execution constitutes an indispensable condition for the effective review and reconsideration of the conviction and sentence of Mr. Kulbhushan Sudhir Jadhav pic.twitter.com/OwlznZP6of
— ANI (@ANI) July 17, 2019
हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधवयांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे. जाधव यांच्या फाशीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. शिवाय त्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याची परवानगीही देण्यात आली आहे. भारताच्या दृष्टीने हा मोठा विजय मानला जात आहे. भारताच्या बाजून १५ वि. १ अशा मतांनी हा निकाल देण्यात आला.
द हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी साडेसहा वाजता सुनावणी सुरू झाली. मुख्य न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ निकाल वाचन करत आहेत. कुलभूषण जाधव प्रकरणी पाकिस्तानकडून व्हिएन्ना कराराचे उल्लंघन झाले असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. पाकिस्तान जाधव यांना दिलेल्या शिक्षेचा पुनर्विचार करत नाही तोपर्यंत जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येत असल्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायायलायने दिला. तसेच न्यायालयाने जाधव यांना काउन्सिलर अॅक्सेसही (दूतावासाशी संपर्क) दिला.