बलात्कार प्रकरणातील आरोपीना नपुंसक बनवणारे इंजेक्शन देण्याच्या तयारीत आहे हा देश …

दहशतवाद आणि बलात्काराच्या विषयावरून सर्व जग त्रस्त आहे त्यामुळे या दोन्हीही गुन्ह्यात कठोरातल्या कठोर शिक्षा देण्या संदर्भात उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाढत्या बलात्काराच्या आणि लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून युक्रेन येथे बलात्कार प्रकरणी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
या नव्या नियमानुसार बलात्कार प्रकरणी आरोपीला नपुंसक बनवणारे इंजेक्शन दिले जाणार आहे. यासाठी त्यांना केमिकल कॅस्ट्रॅक्शन नावाचे इंजेक्शन दिले जाणार आहे. हा नियम लागू केल्यानंतर १६ ते ६५ वर्षापर्यंतच्या हजारो आरोपींना हे इंजेक्शन दिले जाणार असल्याचे ठरविण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
अल्पवयीन वयोगटातील मुलींसोबत बलात्कार किंवा लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींना हे नपुंसक इंजेक्शन दिले जाणार आहे. अमेरिका मधील काही राज्यात हा नियम लागू करण्यात आला आहे. तर नुकताच अमेरिकेच्या अलबामा येथे अशा पद्धतीचा नियम लागू करण्यात आला आहे. एका मीडिया रिपोर्ट नुसार, आरोपींना नपुंसक प्रकारचे इंजेक्शन लावल्यानंतर त्यांची सेक्स करण्याची क्षमता कमी होते. तर २०१७ मध्ये युक्रेन येथे अधिकृतरित्या समोर आलेल्या बलात्काराची ३२० प्रकरणे आहेत.
या आठवड्यात युक्रेनच्या पोलिसांनी एकाच दिवसात पाच बलात्कारच्या घटना घडल्याचे शोधून काढले आहे. त्याचसोबत आरोपींना अटक झाल्यानंतर जर सुटका झाल्यास त्यांच्यावर पोलीस करडी नजर ठेवून असणार आहेत. त्याचसोबत बलात्कार प्रकरणी आरोपीला १५ वर्ष शिक्षा सुनावली जाणार आहे.