हायकोर्टातील न्यायाधीशांना ‘माय लॉर्ड’, ‘यु आर लॉर्डशिप’ असे शब्द आता वापरू नका , राजस्थान हाय कोर्ट

राजस्थान हायकोर्टातील न्यायाधीशांना ‘माय लॉर्ड’, ‘यु आर लॉर्डशिप’ यासारख्या शब्दांनी संबोधता येणार नाही. राजस्थान हायकोर्टाच्या नुकत्याच झालेल्या पूर्ण कोर्ट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे न्यायाधीशांना सन्मानजनक शब्दांनी संबोधता येणार आहे.

Rajasthan High Court issues notice, it states, 'To honour the mandate of equality enshrined in the Constitution of India, the Court has resolved to request the counsels& those who appear before the Court to desist from addressing the judges as 'My Lord & 'Your Lordship'. pic.twitter.com/sg3nOkeWrI
— ANI (@ANI) July 15, 2019
राजस्थान हायकोर्टाने सोमवारी याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली. संविधानातील ‘समानता’ या मूल्याचा सन्मान करत असताना वकील आणि कोर्टातील पक्षकारांनी न्यायाधीशांना ‘माय लॉर्ड’, ‘यु आर लॉर्डशीप’ यासारख्या शब्दांनी संबोधणे बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एखाद्या कोर्टाने न्यायाधीशांना संबोधित करणाऱ्या या खास शब्दांवर हटवण्यात आले आहे. या आधी २०१४ मध्ये न्या. एचएल दत्तू आणि न्या. एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने ‘माय लॉर्ड’, ‘यु आर लॉर्डशीप’ हे शब्द अनिवार्य नसल्याचे स्पष्ट केले होते. न्यायाधीशांना सन्मानपूर्वक संबोधले जावे असेही त्यावेळी स्पष्ट केले होते.