Good News : मराठवाडा, विदर्भात १८ जुलैनंतर मुसळधार पावसाची शक्यता…

राज्यात सर्वत्र पाऊस चांगला झाला असला तरी मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. शिवाय राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. आधीच उशिरा सुरु झालेला मान्सून लांबणीवर पडल्यामुळे महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र १८ जुलैदरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान अभ्यासक शुभांगी भूते यांनी वर्तवला आहे.
महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील चार पाच दिवस अजून पाऊसाची वाट पहावी लागेल असं मतं शुभांगी भूते यांनी व्यक्त केलं आहे.