माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जनसंघाच्या कार्यकर्त्यांचे पाय धुतले

#WATCH: Former Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan washes the feet of Jan Sangh workers during BJP membership programme in Vijayawada, #AndhraPradesh. pic.twitter.com/YyO8s8Rj9e
— ANI (@ANI) July 14, 2019
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे भाजपाच्या सदस्यता अभियाना दरम्यान जनसंघाच्या कार्यकर्त्यांचे पाय धुतले. भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी ट्विट करून सांगितले की, विजयवाडामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते निवास राव यांचे पाय धुतले.
यावेळी शिवराज सिंह यांनी निवास राव यांना, आपण देशाच्या विकासासाठी व भाजपाचे सदस्यता अभियान यशस्वी बनवण्यासाठी पक्षात प्रवेश करावा, अशी विनंती देखील केली आहे.