Karnatka political Drama : अविश्वास प्रस्तावाला सामोरे जाण्याची कुमार स्वामी यांची तयारी

कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय सत्ता नाट्या दरम्यान राज्याच्या कॅबिनेटने सरकार वाचेल अशी आशा व्यक्त केली आहे. भाजपने जरी अविश्वास ठराव आणला तरी त्याला सामोरे जाण्यास तयार असल्याचं कुमारस्वामी सरकारनं म्हटलं आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालीच ही कॅबिनेट बैठक झाली.
सत्ताधारी काँग्रेस-जेडीएसच्या १६ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. परिणामी सरकारचं अस्तित्व धोक्यात आहे. कॅबिनेट बैठकीनंतर ग्रामविकास मंत्री कृष्ण गौडा यांनी सांगितले, ‘बैठकीत राजकीय घटनाक्रमांवर चर्चा झाली. सरकार अस्थिर करण्याचा हा सहावा-सातवा प्रयत्न आहे. आजपर्यंत आम्ही भाजपचे सर्व हल्ले परतवले आहेत. यावेळी परिस्थिती अधिक गंभीर आहे. पण तरीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी एकजुटीने आणि धैर्याने या संकटाचा सामना करण्याचा निश्चय केला आहे.