Aurangabad : बनावट नर्सिंग कॉलेज चालविणारा संचालक गजाआड

बनावट नर्सिंग कॉलेज स्थापन करून ४० ते ५० विद्याथ्र्यांची फसवणूक करणाNया शिक्षण संस्था संचालकास वेदांतनगर पोलिसांनी मंगळवारी (दि.९) गजाआड केले. सुभाष पाटील (रा.गंगापुर, ता.गंगापुर, जि.औरंगाबाद) असे संचालकाचे नाव असल्याची माहिती वेदांतनगर पोलिस ठाण्याच्या सुत्रांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष पाटील याने जनहित शिक्षण प्रसारक मंडळ व आरोग्य सेविका ग्रुप महाराष्ट्र संचलीत जनहित नर्सिंग कॉलेज या नावाने नर्सिंगचे शिक्षण देणारे कॉलेज अदालत रोडवरील चुन्नीलाल पेट्रोलपंपाजवळ सुरू केले होते. परंतु या कॉलेजला शासनाची कोणतीही मान्यता नसतांना, मान्यता असल्याचे भासवून त्याने विद्याथ्र्यांकडून फि पोटी १० ते १२ लाख रूपये जमा केले होते. त्यानंतर विद्याथ्र्यांना नर्सिंगचा अभ्यासक्रम न शिकविता त्यांची फसवणूक केली होती.
याप्रकरणी, मंगल गौतम खरात (वय २२, रा.बाबरा, ता.पुâलंब्री) या विद्यार्थिनीने तक्रार दिल्यावर जनहित नर्सिंग कॉलेजचे संचालक सुभाष पाटील यांच्याविरूध्द वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यावर वेदांतनगर पोलिसांनी सुभाष पाटील याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
घरातच प्रसूत झालेल्या महिलेचा मृत्यू
घरातच प्रसूती होऊन अतिरक्तस्राव झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेचा मंगळवारी (दि.९) सकाळी मृत्यू झाला. प्रीती रघुवीर पवार, असे मृत महिलेचे नाव आहे. ती गंगापूर तालुक्यातील वाळूज परिसरात असलेल्या अजबनगरमधील रहिवासी आहे. प्रीतीची तिच्या घरातच सोमवारी मध्यरात्री प्रसूती झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. मात्र प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव झाल्यामुळे तिला घाटीमध्ये मध्यरात्री हलवण्यात आले. मात्र घाटीत पहाटेच तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद घाटीतील पोलीस चौकीत करण्यात आलेली आहे.