Aurangabad : शहरातील चार शाळांवर आयकर विभागाचे छापे , महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या ताब्यात

शहरातील केंद्रीय माध्यमिक शालांत मंडळाच्या चार शाळा व त्यांच्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाकडून बुधवारी (दि.१०) छापे मारण्यात आले. छापासत्र आणि शाळांच्या नावांबाबत माहिती देता येणार नसून ती गोपनीय कारवाई असल्याचे प्राप्तिकर विभागाचे अधिकारी यांनी सांगितले. पीएसबीए इंग्लिश स्कुल , रॉयल ओक ग्लोबल इंग्लिश स्कुल, आर्किड इंग्लिश स्कुल व ओस्टर इंग्लिश स्कुल या शाळांचा समावेश आहे.
चार शाळांचे प्रत्येकी उत्पन्न चार ते पाच कोटींच्या आसपास असून त्याबाबतची माहिती ही संबंधित शाळांनी लपवून ठेवल्याचा संशय प्राप्तिकर विभागाला होता. उत्पन्ना बाबतचे कुठलेही विवरण, प्राप्तिकर हा संबंधित शाळांनी भरलेला नव्हता. त्यामुळे चार केंद्रीय बोर्डच्या शाळांवर बुधवारी दुपारी एकाचवेळी छापे मारण्यात आले. या कारवाईत ३० अधिकारी, कर्मचारी, पोलीस असा मोठा ताफा होता, अशी माहिती आहे.
या शाळांचे प्रत्येकी अंदाजे उत्त्पन्न ४ ते ५ कोटी दरम्यान आहे. तरी पण या शाळा आयकर विवरण भरून देत नव्हत्या. आज सकाळ पासून या शाळांची तपासणी सुरू आहे. रात्री उशिरा पर्यंत आयकरचे अधिकारी तपासणी करत होते.