Karnataka Political Drama : बंडखोर आमदारांना मुंबईतून गोव्याला हलवले

Rebel Congress-JDS Karnataka MLAs who are staying at a hotel in Mumbai, to shift to Goa pic.twitter.com/3XxwjkOfC6
— ANI (@ANI) July 8, 2019
कर्नाटकात सध्या राजकीय उलथापलथीला वेग आला असताना, दुसरीकडे मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये उतरवण्यात आलेल्या काँग्रेस – जेडीएसच्या आमदारांना आता गोव्याला नेले जात आहे. हे सर्व आमदार सायंकाळी गोव्यास निघाले आहे. मुंबईतील हॉटेल बाहेर आज पुन्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांविरोधात निर्दशनं केली होती. शिवाय कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी.के. शिवकुमार हे देखील दुपारीच बंगळुरमधुन मुंबईकडे निघाले होते. या पार्श्वभूमीवरच या आमदारांना गोव्याला नेले जात असल्याची शक्यता आहे.
या अगोदर कर्नाटकातील अपक्ष आमदार व मंत्री नागेश यांनी देखील राजीनामा देत भाजपाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. तसेच, काही दिवसांपुर्वीच काँग्रेसमधुन बडतर्फ करण्यात आलेल्या आमदार रोशन बेग यांनी देखील भाजपात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ता वाचवण्यासाठी काँग्रेस- जेडीएसच्या बैठका सुरू आहेत. बंडखोर आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही.
या अगोदर कर्नाटक सरकारचे संकटमोचक डी.के. शिवकुमार मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून १६ नाराज आमदारांना गोव्याच्या दिशेने रवाना करण्यात आले आहे. काहीवेळापूर्वीच हे आमदार गोव्याच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय सर्व नाराज आमदारांना घेऊन गोव्याकडे रवाना झाल्याची माहिती आहे.