ICC World Cup 2019 Ind vs SL Live updates : रोहित-राहुलची शतकांचा प्रभाव ; भारताकडून श्रीलंकेचा दणदणीत पराभव

रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या शतकी खेळींच्या जोरावर भारतीय संघाने श्रीलंकेवर ७ गडी राखून दणदणीत विजय प्राप्त केला. या विजयासह भारतीय संघाने १५ गुणांसह अव्वल स्थान गाठलं आहे.
आजच्या सामन्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे एका वर्ल्डकप स्पर्धेत पाच शतकं ठोकण्याचा पराक्रम रोहित शर्माने केला विशेष म्हणजे रोहितने ९४ चेंडूत १०३ धावांची खेळी साकारली. यात १४ धडाकेबाज चौकार आणि २ दणकेबाज षटकारांचा समावेश आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही रोहित ६४७ धावांसह पहिल्या क्रमांकावर आहे. लोकेश राहुलने १११ धावांची खेळी साकारून सलामीवीर म्हणून स्वत:ची योग्यता सिद्ध करून दाखवली. रोहित आणि राहुल यांनी सलामीसाठी १८९ धावांची विक्रमी भागीदारी केली . रोहित बाद झाल्यानंतर कोहलीने मैदानाचा ताबा घेत नाबाद ३४ धावांची खेळी साकारून भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
प्रारंभी , श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता मात्र श्रीलंकेची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या ५५ धावांवर श्रीलंकेचे चार फलंदाज माघारी परतले होते. श्रीलंका बिकट स्थितीत असताना अँजलो मॅथ्यूज संघासाठी धावून आला. मॅथ्यूजच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेला २६४ धावा करता आल्या. बुमराहने श्रीलंकेच्या फलंदाजांना जेरीस आणलं. बुमराहने त्याच्या १० षटकांमध्ये केवळ ३७ धावा देत ३ गडी बाद केले. बुमराहने या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील बळींचं शतक देखील पूर्ण केलं. भुवनेश्वर कुमार, पंड्या, कुलदीप आणि जडेजा यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारताने श्रीलंकाचा ७ गडी राखून पराभव केला
भारत 265/3 (43.3)
हार्दिक पांड्या * 7 /4
विराट कोहली * 34/41
लोकेश राहुल (OUT) 100/109
रोहित शर्मा (Out ) 103/94
लंकेच्या ५० षटकांत ७ बाद २६४ धावा; भारतासमोर विजयासाठी २६५ धावांचं आव्हान
अखेरच्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्यानं टिपला अप्रतिम झेल, थिसारा परेरा २ धावांवर बाद
श्रीलंका 264/7 (50.0)
धनंजय डी सिल्वा *27 /35
ईसुरु उदाना 1/ 1
थिसारा पेरेरा2/ 2 (Out )
अँजेलो मॅथ्युज (Out ) 103/ 118
लहिरू थिरिमंने * (Out ) 39/ 57
वर्ल्डकप स्पर्धेत आज हेडिंग्लेवर भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत सुरू आहे. या लढतीत भारतीय संघाचं पारडं जड मानलं जात आहे. श्रीलंकेचं वर्ल्डकप स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं उपांत्य फेरीत धडक दिली आहे.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणरत्नेने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात आजच्या सामन्यासाठी दोन बदल करण्यात आले आहेत. चहल आणि शमी यांना विश्रांती देण्यात आली असून, कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजाला संघात संधी देण्यात आली आहे.