News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

गौरी लंकेश हत्याप्रकरणी संघाविरुद्ध ट्विट केल्याचे प्रकरण. राहुल गांधींना १५ हजारांचा जामीन मंजूरः सूत्रांची माहिती.
गौरी लंकेश हत्याप्रकरणी संघाविरुद्ध ट्विट केल्याचे प्रकरण. आपण दोषी नसल्याचे राहुल गांधींचा जबाब
मुंबईः डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास दोन आठवड्यांत संपवणार. मुंबई क्राईम ब्रांचची हायकोर्टात माहिती.
मुंबईः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्धची लढाई सुरूच ठेवणारः राहुल गांधी
मुंबईः राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल असून याबाबत शनिवारी सुनावणी
राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात.
वर्ल्डकपः अफगाणिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिजने टॉस जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
अहमदनगरः जनावरांना चारा म्हणून ऊस तोडणीसाठी गेलेल्या तरुणावर बिबट्याचा हल्ला.
उत्तर प्रदेशः शिया आणि सुन्नी वक्फ बोर्डातील भ्रष्टाचाराचा सीबीआय तपास करणार.
संघ आणि भाजपचे लोक वंचित बहुजन आघाडीमध्येः लक्ष्मण माने यांचा आरोप.
लक्ष्मण मानेंना वंचितचे प्रदेशाध्यक्षपद न मिळाल्याने त्यांची आगपाखडः गोपिचंद पडळकर
औरंगाबाद: प्राध्यापकांची भरती केंद्रीय पद्धतीने करा या मागणीसाठी अभाविप तर्फे सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने
दाभोलकर-पानसरे प्रकरणात सीबीआयची मुंबई हायकोर्टाकडून कानउघाडणी
अहमदनगर: इंजिनिअर तरुणाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या. राहुल पवार असं तरुणाचं नाव. चार महिन्यापूर्वी झाला होता विवाह.
बँकांच्या परीक्षा आता मराठी भाषेसह १३ भाषांमध्ये होणारः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची लोकसभेत माहिती.
मतदानाला बंधनकारक करण्याच्या मागणीसाठी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
मुंबईः माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरीही शिवडी कोर्टात दाखल.
मुंबईः प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शिवडी कोर्टात जाण्यास पोलिसांकडून मनाई.