वडिलांच्या माफीनंतर आमदार नितेश राणे अखेर कणकवली पोलिसांसमोर शरण

दरम्यान, नितेश राणे यांचे वडील आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांनी मुलाच्या या कृत्याबद्दल माफी मागितल्यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे अखेर कणकवली पोलिसांसमोर शरण आले. उपअभियंत्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी राणे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. राणे यांच्यासह त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. उद्या या तिघांनाही कोर्टात हजर करण्यात येणार आहे. नितेश राणे आणि त्यांच्या ४०-५० कार्यकर्त्यांविरोधात भारतीय दंड विधानाच्या ३५३, ३४२, ३३२, ३२४, ३२३, १२० ए, १४७, १४३, ५०४, ५०६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तासा-दोन तासांत नितेश राणे स्वत:च कणकवली पोलिसांना शरण आले.
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झाल्याने संतापलेले आमदार नितेश राणे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना दमदाटी करत त्यांच्या अंगावर चिखलाचं पाणी ओतलं. त्यानंतर त्या उपअभियंत्याला धक्काबुक्की करत पुलावर बांधले. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
Congress MLA Nitesh Narayan Rane surrenders before Kankavali police. FIR has been registered against him & 40-50 supporters under Sections 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 of IPC. He & his supporters threw mud on an engineer earlier today. pic.twitter.com/QG9bQpofzT
— ANI (@ANI) July 4, 2019