Good News : सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्र आता वेबसाइटवर मराठीतही मिळणार

सुप्रीम कोर्टातील खटल्यांचे निकालपत्र आता इंग्रजीसह हिंदीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत. आतापर्यंत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवर इंग्रजी भाषेत निकालपत्र अपलोड करण्यात येत होते. मात्र, ते आता मराठी, हिंदीसह कन्नड, आसामी, उडिया, तुलुगू भाषेतही वेबसाइटवर अपलोड करण्यात येणार आहे.
या महिनाअखेरीस हिंदी आणि मराठीसह अन्य प्रादेशिक भाषांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निकाल वेबसाइटवर अपलोड होतील. बऱ्याच वर्षांपासून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे निकाल हिंदीमध्ये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली जात होती. सूत्रांच्या माहितीनुसार, हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये निकालपत्रे उपलब्ध करून देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. सुरुवातीला ५०० पाने आणि विस्तृत निकालपत्रे संक्षित स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.