Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तोंडाला दुर्गंधी येतेय म्हणून आलिंगन देण्यास नकार दिल्याने मित्राला भोसकले !!

Advertisements
Advertisements
Spread the love

तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे मिठी मारण्यास नकार दिला म्हणून चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना बेंगळुरू येथील मावल्ली मशीद परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नबी उर्फ बल्ली याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शोएब पाशा (२३) बेंगळुरुमधील एलबीएफ रस्त्यावरून दुचाकी चालवत जात असताना त्याचा मित्र नबी दिसला म्हणून त्याच्याशी बोलण्यासाठी शोएबने बाइक थांबवली. नबीने त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला. तो जवळ येण्याचा प्रयत्न करताच शोएबने त्याच्या तोंडातून दुर्गंधी येत असल्याचं कारण देत त्याला दूर सारले. यामुळे नबीला राग आला आणि दोघांमध्ये वादावादी झाली.

Advertisements

वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले आणि भररस्त्यात चाकू काढून नबीने शोएबला पोटात भोसकले.  शोएबने मदतीसाठी त्याचा लहान भाऊ शाहीद याला बोलवले. शाहीद येताच त्याच्यावरही चाकूहल्ला करून नबी फरार झाला. स्थानिकांनी लगेच दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. दोघांची प्रकृती आता स्थिर आहे. नबीवर कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवारी अटक केल्यानंतर नबीला कोर्टासमो हजर करण्यात आलं.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!