स्विस बँकेत जाणारा काळा पैसा थांबला , भारताचा क्रमांक ७४ ऐवजी ७३ वर

स्विस नॅशनल बँकेत ब्रिटिश धनाढ्य व्यक्ती व उद्योग समूहांच्या सर्वाधिक ठेवी असून या यादीत यंदा भारत ७४व्या स्थानी गेला आहे. गेल्यावर्षी भारत या यादीत ७३व्या स्थानी होता. स्विस बँकेत जगभरातील धनिकांच्या व उद्योग समूहांच्या ठेवी असून या ठेवींवरून देशनिहाय क्रमवारी बँकेकडून जाहीर करण्यात आली आहे. यात एकूण ठेवींपैकी केवळ ०.७ टक्के इतकीच रक्कम या बँकेत भारतीयांची असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी ब्रिटिश खातेधारकांच्या खात्यात सर्वाधिक २६ टक्के इतकी रक्कम असल्याचे ही आकडेवारी सांगते. दरम्यान, स्विस बँकेत भारतीयांकडून दडवला जाणारा काळा पैसा हा नेहमीच कळीचा मुद्दा राहीला असून याविरोधात सरकारची जी मोहीम सुरू आहे त्यास थोड्याफार प्रमाणात यश मिळत असल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसत आहे.
स्विस बँकेतील ठेवींच्या यादीत अमेरिका दुसऱ्या स्थानी असून वेस्ट इंडिज तिसऱ्या, फ्रान्स चौथ्या तर हाँगकाँग पाचव्या स्थानी आहे. बँकेत जमा ठेवींपैकी ५० टक्के ठेवी या पाच देशांमधील नागरिकांच्या आहेत. बहामास, जर्मनी, लग्झमबर्ग, केमन आइसलँड आणि सांगापूर हे देश पहिल्या दहांमध्ये असून दोन तृतीयांश ठेवी याच देशांतील नागरिकांच्या आहेत. स्विस बँकेत गेल्या वर्षभरात विदेशातील खातेधारकांनी एकूण ९९ लाख कोटी रुपये आपल्या खात्यात जमा केल्याचेही या आकडेवारीवरून स्पष्ट होते.