News Updates : काँग्रेस नेत्यांच्या दिल्ली बैठकीत राष्ट्रवादीसोबतची युती फायनल , वंचित बहुजन आघाडीशी ६ जुलैला चर्चा : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

लोकसभेतील महाराष्ट्र काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभेसाठी चर्चा करण्याची तयारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. राष्ट्रवादीसोबत आघाडीचे निश्चित झाले असून वंचितसोबत चर्चा करण्याची तयारी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
आज नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. विधानसभेतील रणनितीवर यामध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीला झालेल्या मतविभाजनामुळे काँग्रेसच्या लोकसभेच्या ९ जागा पडल्याचेही चर्चेत आले. यामुळे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Congress Chief after meeting at Rahul Gandhi's residence in Delhi, today: Had discussion on upcoming Maharashtra Legislative Assembly polls. Talks on alliance with NCP almost finished,discussion on seats yet to be done. Open for talks with Vanchit Bahujan Aghadi party pic.twitter.com/NHChBCGEmF
— ANI (@ANI) June 29, 2019
वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करणे आणि त्यांच्याशी आघाडी करण्याची जबाबदारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. तसेच वंचित आघाडीच्या नेत्यांसोबत येत्या ६ जुलै रोजी बैठक घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. तसेच अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यावरून बोलणे संपले आहे. आता जागावाटपावर शिक्कामोर्तब होणे बाकी असल्याचे सांगितले.
इतर बातम्या एक नजर …
ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ८६ धावांनी विजय मिळवला. गोलंदाज मिशेल स्टार्कने पाच बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली
मुंबई: पाण्यावरून झालेल्या भांडणात दीरानं केली वहिनीची हत्या; खार येथील घटना
वर्ल्डकप: चुरशीच्या लढतीत पाकिस्तानची अफगाणिस्तानवर ३ गडी राखून मात
औरंगाबाद: भरमसाठ शुल्कवाढीविरोधात लिटल फ्लॉवर शाळेच्या पालकांचा शिक्षणाधिकारी कार्यालयात ठिय्या
नवी दिल्ली: काँग्रेसच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांचा अखिल भारतीय काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
जळगावः महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करण्यावरून वाद, विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या.
पुणे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना २५ हजार रुपयांची मदत. कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश
मुंबईः मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काही केले नाहीः उद्धव ठाकरे.
मुंबईः मराठा आरक्षणाला पाठिंबा दिल्याबद्दल मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी मानले उद्धव ठाकरे यांचे आभार.
जपानमधील जी-२० बैठकीत सहभागी झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतण्यासाठी रवाना.
औरंगाबादः सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विद्यापीठात काम बंद आंदोलन
मुंबईः अंधेरी पश्चिममध्ये विजेचा शॉक लागून ६० वर्षीय महिलेचा मृत्यू.
ठाणेः विजेच्या धक्क्यानं ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
एएन 32 विमान अपघातातील रेस्क्यू टीमला सुरक्षित आणण्यास हवाई दलाला यश; गेल्या ९ दिवसांपासून अडकलेले
केरळमध्ये कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ ठार; ७ जखमी
यवतमाळ : वीज पडून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू. दादाराव लुकाजी राठोड (५५) रा. मारवाडी ता. नेर आणि चंद्रभान दमडू चव्हाण (३५) रा. आरंभी ता. दिग्रस अशी मृतांची नावे आहेत.