Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ICC World Cup 2019 : इंग्लंडचे भारतासमोर ३३८ धावांचे तागडे आव्हान

Advertisements
Advertisements
Spread the love

वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने भारतीय संघासमोर विजायासाठी ३३८ धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्ट्रोनं खणखणीत शतक झळकावलं. तर अष्टपैलू बेन स्टोक्सनं ५४ चेंडूत ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने भारतीय संघासमोर विजायासाठी ३३८ धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्ट्रोनं खणखणीत शतक झळकावलं. तर अष्टपैलू बेन स्टोक्सनं ५४ चेंडूत ७९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली.

Advertisements

भारतीय संघाकडून मोहम्मद शमीने पाच गडी बाद केले. पण शमीच्या १० षटकात इंग्लंडने ६९ धावा वसुल केल्या. सामन्याच्या सुरुवातीपासूनचं इंग्लंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांवर वरचढ राहिले. जॉनी बेअरस्ट्रो आणि जेसन रॉय यांनी दमदार सुरुवात करत दिडशतकी भागीदारी रचली. जेसन रॉयने ५७ चेंडूत ६६ धावा केल्या. बेअरस्ट्रोनं १०९ चेंडूत १११ धावांची खेळी साकारली. यात १० चौकार आणि ६ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे.

Advertisements
Advertisements

रॉय माघारी परतल्यानंतर जो रुटनं बेअरस्ट्रोला साथ देत इंग्लंडच्या धावसंख्येला आकार दिला. रुटनं ४४ धावांचं योगदान दिलं. शमीने कर्णधार मॉर्गनला अवघ्या एका धावेवर तंबूत धाडलं. त्यानंतर भारतीय संघाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, बेन स्टोक्सनं तुफान फटकेबाजी करत संघाला तीनशेचा आकडा गाठून दिला. स्टोक्सने केलेली ७९ धावांची खेळी महत्त्वपूर्ण ठरली. यात ६ खणखणीत चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!