News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

मुंबईः २०२० पर्यंत इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम पूर्ण होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
वर्ल्डकपः दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ९ गडी राखून दणदणीत विजय
उत्तर प्रदेशः सरकारकडून अनुसूचित जातींच्या यादीत कश्यप, मल्लाह, कुंभार, राजभर, प्रजापती आणि अन्य १७ जातींचा समावेश
कोल्हापूर – लक्ष्मीपुरीतील हॉटेल पल्लवी येथे तिघा जणांनी केले विषप्राशन, पती-पत्नीचा मृत्यू, मुलगा अत्यवस्थ
पुणेः राज्यात दोन जुलैपर्यंत कोकण आणि विदर्भात जोरदार, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता कृषी हवामान खात्याने वर्तविली
पुणेः ७२ वर्षाच्या आजीने मूत्रपिंड दान करून १२ वर्षीय नातवाला दिले जीवनदान
दिल्लीः आयसीआयसीआय-व्हिडिओकॉनप्रकरणी अध्यक्ष वेणूगोपाल धूत यांची ईडीकडून कसून चौकशी; उद्याही चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
औरंगाबादः २०० रुपयाची लाच घेताना सर सय्यद उर्दू शाळेच्या मुख्यध्यापिका समिना सय्यद आणि लिपिक हैदरखान हुसेनखान गजाआड
औरंगाबाद: विद्यार्थिनीला पाणी आणण्यास सांगून तिच्या घरात विनयभंग करणारा कराटे प्रशिक्षक संदेश रामेश्वर धुवारे याला ३ वर्ष सक्त मजुरी व ५ हजार दंड
औरंगाबाद: दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पडून सुमारे ४० जणांना ५ कोटी १२ लाखांचा गंडा घालणारा विजय प्रभाकर खोडगे याला ७ वर्ष सक्तमजुरी व २ लाख दंडाची शिक्षा
नागपूर: सकल मराठा समाजाची दीक्षाभूमीला भेट; घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन
पुणेः पेबल पार्कमधील १५ मजल्यावरून उडी मारून पतीची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी पत्नीला केले जखमी
मुंबईः आगामी २४ तासांत जोरदार पावसाचा कुलाबा वेधशाळेचा अंदाज
अकोला : बाळापूर तालुक्यातील बोराळा येथे शेतात पेरणी करताना वीज अंगावर पडल्याने दोन शेतकरी ठार.