Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एका भावनिक चुकीमुळे स्वतःच्या चार वर्षीय मुलीसमोर गेले “पिंकी”चे प्राण !!

Spread the love

विवाहित प्रेयसीने नवऱ्याचे घर सोडून सोबत पळून यायला नकार दिला म्हणून प्रियकराने धारदार शस्त्राने तिची हत्या केली व नंतर स्वत: आत्महत्या करुन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीच्या चार वर्षाच्या मुलासमोरच तिची हत्या करण्यात आली. चिराग दिल्लीमध्ये शु्क्रवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडली.

पिंकी चौहान (२४) असे मृत महिलेचे नाव आहे. पाच वर्षांपूर्वी पिंकीने कुटुंबियांच्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न केले. लग्नानंतर वर्षभराने पिंकीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. नवरा कुटुंबाला आर्थिक दृष्टया स्थैर्य देण्याचा प्रयत्न करत असताना तिने मुलाच्या संगोपनावर लक्ष केंद्रीत केले. त्याचवेळी कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून तिने एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरी सुरु केली.

एका व्हॅलेंटाइन्स डे ला पिंकीच्या आयुष्याने एक वेगळे वळण घेतले. एका ओळखीच्या व्यक्तीने तिची दक्षिण दिल्लीत देवळी येथे राहणाऱ्या सनी नावाच्या मुलाबरोबर ओळख करुन दिली. पिंकी आणि सनीची चांगली मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघे वेगवेगळया ठिकाणी फिरायचे. त्यामुळे पिंकीच्या नवऱ्याला याबद्दल कळले. त्यानंतर हे प्रेमसंबंध संपवण्यासाठी हे कुटुंब देवळी येथून चिराग दिल्ली येथे राहायला गेले.

नवऱ्याने पिंकीला घरी राहून कुटुंबाचा सांभाळ करण्यास सांगितले. नवऱ्याने पिंकीवर लादलेले हे निर्बंध सनीला मान्य नव्हते. नवरा घरी नसताना सनी त्यांच्या घरी यायचा. अनैतिक संबंध ठेऊन आपण चूक केली आहे हे पिंकीला नंतर कळून चुकले. त्यानंतर तिने सनीला टाळायला सुरुवात केली. पिंकीचे बदलले हे वर्तन पाहून सनीची चिडचिड सुरु झाली. नवऱ्यापासून घटस्फोट घेण्यासाठी त्याने पिंकीच्या मागे तगादा लावला होता.

पिंकीने पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्यानंतर सनी आणखी खवळला. शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास तो तिच्या चिराग दिल्लीतील घरी आला. आपण दोघे पळून जाऊ असे तो तिला सांगत होता. पण पिंकीने त्याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर त्यांच्यात वादावादी सुरु झाली. त्यानंतर संतापलेल्या सनीने चाकू बाहेर काढला व पिंकीवर वार केले. त्यानंतर त्याने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघे रक्ताच्या थारोळयात पडलेले होते. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी पिंकीला मृत घोषित केले तर सनी आयसीयुमध्ये दाखल असून त्याची प्रकृती गंभीर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!