केंद्रीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत आता चहा -बिस्कीट नव्हे , , बदाम आणि अक्रोड !! मंत्री हर्षवर्धन यांचे आदेश

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या बैठकीत आणि कँटीनमध्ये बिस्किटांऐवजी बदाम तसेच अक्रोड खायला देण्याचे आदेशच केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिले आहेत. त्याबाबतचे निर्देशही जारी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे देशभरातील सरकारी कार्यालये आणि रुग्णालयांमधील कँटीनमध्येही बदाम आणि अक्रोड ठेवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी कँटीनमध्ये आणि बैठकांमध्ये हेल्दी फूड देण्याच्या यापूर्वीच सूचना केल्या होत्या. त्यानुसार आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या बैठकांमध्ये स्नॅक्स म्हणून खाण्यासाठी चने, लाह्या, खजूर, भाजलेले चने, बदाम आणि अक्रोड देण्यात येणार आहे. तंदुरुस्त राहण्यासाठी अशा प्रकारचे खाद्यपदार्थ कँटीन आणि बैठकांमध्ये खाण्यासाठी ठेवायला हवेत, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या बैठकांध्ये प्लास्टिकच्या बॉटल्यांचा वापर न करण्याचाही निर्णय घेतला आहे.