Narendra Modi in Japan : भारतीयांच्या हजच्या कोट्यात ३० हजारांची वाढ

सौदी अरेबियाने भारतीय मुस्लिमांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून हज कोट्यात ३० हजारांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे दरवर्षी हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या आता १ लाख ७० हजाराहून दोन लाखांवर पोहोचली आहे. या वर्षापासून ३० हजार अन्य भाविकांना हज यात्रेला जाण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये द्विपक्षीय चर्चा पार पडली. यावेळी हज कोट्यावर चर्चा झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
नरेंद्र मोदी सध्या जी-२० परिषदेच्या निमित्ताने जपानमध्ये आहेत. द्विपक्षीय चर्चेदरम्यान नरेंद्र मोदी यांनी मुहम्मद बिन सलमान यांच्यासबोत व्यापार, गुंतवणूक, दहशतवादविरोधी लढा अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी माहिती दिली की, मोहम्मद बिन सलमान यांनी भारताचा हज कोटा १ लाख ७० हजारावरुन दोन लाख करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं असल्याची माहिती दिली. हे महत्त्वाचं असून, हे झालं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.