Loksabha 2019 : खा. इम्तियाज जलील यांनी थेट लोकसभेत मांडला औरंगाबादचा पाणी प्रश्न

लोकसभेत जाण्याची संधी मिळाल्यानंतर लोकसभेतील आपल्या छोटेखानी भाषणात औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नाला थेट देशाच्या सर्वोच्च सभागृहात उपस्थित करून देशातील एकूणच पाणी प्रश्नावर चर्चा करण्यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्याची विनंती केली.या प्रश्नावर बोलताना खा. जलील म्हणाले कि , महाराष्ट्र्र आणि औरंगाबादेत भाजपाची सत्ता असताना पाणी पुरवठा योजनेचे खासगीकरण करण्यात येत आहे . परिणामी शहरवासीयांना आणि खास करून महिलांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे . हा प्रश्न सोडविण्यात यावा अशी विनंतीही त्यांनी सभागृहाला केली .
आपल्या भाषणात त्यांनी सभागृहाचे स्पीकर ओम बिर्ला यांच्या निःपक्ष व्यवहाराचे समर्थन करताना , लोक जेंव्हा संसदेविषयी विचारतील तेंव्हा सरकारविषयी आम्ही काही बोलणार नाही पण आमचे लोकसभेचे अंपायर चांगले आहेत असे जरूर सांगू असेही ते म्हणाले .
औरंगाबाद -जयपूर -दिल्ली हि विमानसेवा पुरवत करून पर्यटन उद्द्योगाला चालना द्या
या पूर्वी बुधवारी त्यांना जेंव्हा बोलण्याची संधी मिळाली त्यावेळी खासदार जलील यांनी जग प्रसिद्ध औरंगाबादच्या पर्यटनाचा आणि विमानसेवेचा मुद्दा मांडला . संसदेत बोलताना खा. जलील म्हणाले कि , ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेची सुरुवात ऐतिहासिक महत्त्व असलेल्या औरंगाबाद शहरापासून करावी, त्यासाठी औरंगाबाद विमानतळावरून पूर्वीप्रमाणेच मुंबई -जयपूर – दिल्ली अशी विमानसेवा सुरु करावी , सध्या हि सेवा बंद आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दिलेल्या त्यांच्या भाषणात पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याची घोषणा केली आहे. या योजनेची सुरुवात औरंगाबादेतून करावी. जेट एअरवेज बंद पडल्याचा त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राची पर्यटन राजधानी औरंगाबादला बसला आहे. औरंगाबादहून दिल्ली आणि मुंबईला जाणारी दोन विमाने बंद झाल्याने जगभरातून येणारे पर्यटक, तसेच उद्योजकांची गैरसोय होत आहे. परिणामी त्याचा शहरातील पर्यटन उद्योग, हॉटेल, ट्रान्सपोर्ट व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला आहे . जागतिक वारसा स्थळाचा दर्जा असलेली अजिंठा आणि वेरूळ हि दोन पर्यटनस्थळे औरंगाबादपासून शंभर किलोमीटरच्या आत आहे, हे औद्योगिक शहर असल्याने विमान सेवेबाबत विचार करावा, अशी विनंती त्यांनी केली.
पूर्वी दिल्ली-जयपूर-उदयपूर-औरंगाबाद-मुंबई शहरे जोडणारी विमान सेवा सुरू होती, त्यामुळे जगभराचे पर्यटक येत असत. त्यामुळे शहराची भरभराट झाली. कालांतराने हे विमान बंद पडल्याने पर्यटन व्यवसायाला घरघर लागली. त्यामुळे या मार्गावर एअर इंडियामार्फत सेवा द्यावी, असे ते म्हणाले. खासदार जलील यांनी मंगळवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरप्रित पुरी यांची भेट घेऊन औरंगाबाद विमानतळाचा समावेश उड्डाण योजनेत करावा, अशी मागणी केली. शिवाय नागरी हवाई वाहतूक संचालनालयाच्या सचिव उषा पाधी यांच्याशीही चर्चा केली. शिर्डी विमानतळ सुरू झाल्यानंतर शिर्डीसाठीचे विमान बंद केले असून संबंधित कंपन्यांशी चर्चा करून ते औरंगाबादेतून सुरू करावे, अशी मागणी केली. विमान कंपन्या, टुर्स ऑपरेटर आणि उद्योजकांची लवकरच संयुक्त बैठक घेणार असल्याची माहिती पाधी यांनी खासदारांना दिली.