Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Gujrat Mob Lynching : प्रियकर आणि विवाहित प्रेयसीला जमावाची अमानूष मारहाण !! विवस्त्र करून काढली धिंड …

Advertisements
Advertisements
Spread the love

गुजरातच्या दाहोदमध्ये बुधवारी काही लोकांनी प्रियकर आणि प्रेयसीला जबर मारहाण केली. यावर मन भरले नाही म्हणून विवस्त्र केलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या खांद्यावर बसवून एक किमी फिरविल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर सक्रीय झालेल्या पोलिसांनी सात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी या प्रकरणी पाच आरोपींनी अटक केली आहे. तर दोघांच्या शोधात आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे प्रभु, मीनेष, जयंती, राजू आणि निलेश असे आहे.

Advertisements

दाहोद जिल्ह्यातील फतेपुरा तहसीलमध्ये राहणारी विवाहित महिला आणि झालोदमध्ये राहणारा अविवाहित तरुण १७ दिवसांपूर्वी पळून गेले होते. ते या काळात इडरच्या मेसण गावात मोलमजुरी करून दिवस घालवत होते. यावेळी काही गावकऱ्यांनी दोघांना पकडले आणि महिलेच्या सासरी घेऊन आले.

Advertisements
Advertisements

यानंतर गावकऱ्यांनी तरुणाला निर्वस्त्र करत दोऱ्यांनी बांधले आणि दांड्याने मारहाण केली. यानंतर त्यांनी महिलेलाही मारहाण केली मात्र, दांडा तुटला. एवढ्यावरच न थांबता तरुणाला या महिलेच्या खांद्यावर बसवून एक किमीपर्यंत धींड काढली. यावेळी सोबत चालणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर दगड़ही फेकले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!