नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण : कळसकर आणि अंदुरेनंच नरेंद्र दाभोलकरांवर झाडल्या गोळ्या’

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी एक मोठा खुलासा समोर आला आहे. शरद कळसकर आणि सचिन अंदुरेने या दोघांनीच नरेंद्र दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआयने न्यायालयात दिली. याबाबतचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले. पुण्यातील विशेष कोर्टात सीबीआयने एक अहवाल सादर केला. या अहवालात कळसकर आणि अंदुरे या दोघांनी दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याचे म्हटले आहे. दाभोलकर हत्या प्रकरणातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा असल्याचे मानलं जातं.
दाभोलकरांवर गोळ्या झाडल्याची कबुली कळसकरने दिल्याचे सीबीआयने या अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षी कळसकरवर फोरेन्सिक सायकॉलॉजिकल अॅनेलेलिस टेस्ट झाली होती. या टेस्टमध्ये त्याने दाभोलकरांवर गोळ्या झाल्याची कबुली दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे. जून 2018मध्ये कळसकरने संजीव पुनाळकरची भेट घेतली होती. काळसकरने पुनाळकरला हत्येची सामग्री नष्ट करण्यास सांगितल्याचे सीबीआयने कोर्टात सांगितले.