Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नागपूर -औरंगाबाद मार्गावर झालेल्या अपघातात कन्नडचे चार जागीच ठार , क्षीरसागर कुटुंबियांवर काळाचा घाला

Spread the love

जिल्ह्यातील मेहकरजवळील अंजनी खुर्द येथे बोलेरो व कंटेनरच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. नागपूर -औरंगाबाद मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला असून पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली . त्यानंतर, मृतांना जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले . कन्नड येथील क्षीरसागर कुटुंब मुलासाठी मुलगी पहायला गेले होते. परत येत असताना हा अपघात झाला. या अपघातात आई, वडील, मुलगी, व बोलेरो चालवणारा चालक जागीच ठार झाले. पार्थिव मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आलेले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!