Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Sangali Crime : पत्नीला पळवून नेलेल्या प्रियकराची पतीने केली हत्या , दोघांना अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

पत्नीला तिच्या प्रियकराने पळवून नेल्याच्या रागातून पतीने तिच्या प्रियकराची हत्या केल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. प्रियकाराचे हात बांधून त्याच्या डोक्यावर घाव घालून ही हत्या करण्यात आली. गणेश राजपूत असं मृत तरूणाचं नाव आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सचिन संतराम होळीकट्टी आणि चंद्रकांत उर्फ पिंटू नारायण पुजारी या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली. संतराम होळीकट्टी हा हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे.

Advertisements

संतराम होळीकट्टीच्या पत्नीला काही महिन्यांपूर्वी गणेश राजपूतने पळवून नेलं होतं. याचा राग संतरामच्या मनात होता. सांगलीतील मीरा हाऊसिंग सोसायटीच्या मागच्या बाजूला असलेल्या मळ्यात संतरामने गणेश राजपूतचा लाकडी दांडका डोक्यात घालून खून केला. गणेश राजूपत आणि संतराम होळीकट्टी यांच्यात मैत्री होती, त्यामुळे गणेश हा संतरामच्या घरी ये-जा करत असे. गणेशचे आणि संतराम होळीकट्टीच्या पत्नीचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते. गणेशने त्याच्या पत्नीला पळवूनही नेले या सगळ्याचा राग संतराम होळीकट्टीच्या मनात होता.

Advertisements
Advertisements

गणेश काही कामानिमित्त २० जून रोजी म्हणजेच गुरूवारी सांगलीमध्ये आला होता. त्यावेळीही तो घरी आला असल्याची माहिती संतराम होळीकट्टीला मिळाली. ज्यानंतर शुक्रवारी म्हणजेच काल २१ जून रोजी सचिनने गणेशला त्याच्या एका मित्रासह तात्यासाहेब मळा या ठिकाणी असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तिथे त्याचे हात बांधून त्याच्यावर लाकडी दांडक्याने वार केले आणि त्याची हत्या केली. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी संतराम होळीकट्टी आणि चंद्रकांत पुजारी या दोघांनाही अटक केली. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!