India vs Afghanistan Live Cricket Score: भारत वि. अफगाणिस्तान अपडेट्स , ११ धावांनी भारत जिंकला !!

अफगानिस्तान 213/7 (49.5)
मोहम्मद नबी 46/ 50
आय खील 6/ 8
नजीबुल्लाह जद्रान 20 / 19 (Out )
असगर अफगान 8/ 17 (Out )
आजच्या सामन्यात भारतीय संघाची वन-डे क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध लढत आहे. या वर्ल्ड कपमधील पाचही लढती गमावणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्ध विक्रमी कामगिरी करण्याची संधी भारताला आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला असून भारत दमदार बॅटिंग केली असली तरी मोठी धावसंख्या उभारण्यात भारत अपयशी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेत दोन शतके ठोकणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध स्वस्तात माघारी परतला. मुजीब उर रहमानने त्याला त्रिफळाचीत करत एका धावेवर माघारी धाडले आणि भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. सलामीवीर लोकेश राहुल याने चांगली खेळी केली पण रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ३० धावा केल्या. या दरम्यान दमदार कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले.
चांगली सुरुवात करताना विजय शंकरने ४१ चेंडूत २९ धावा करून तो रहमत शाहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दमदार अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली ६३ चेंडूत ६७ धावा करून माघारी गेला. विराटने ५ चौकार लगावले. मोहम्मद नबीला दुसरा बळी मिळाला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी अत्यंत संथ खेळी केली. शेवटच्या टप्प्यात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात धोनी माघारी परतला. धोनीने ३ चौकारांसह ५२ चेंडूत २८ धावा केल्या.
भारताने या स्पर्धेतील ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड विरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. पण दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या तीन तुल्यबळ संघाना भारताने धूळ चारली. अफगाणिस्तानला ५ सामन्यात अद्यापही विजय मिळवता आलेला नाही.
भारताचा स्कोअर
224/8 (50.0)
कुलदीप यादव 1 / 1
जसप्रीत बुमराह 1 / 1
केदार जाधव : 47/63
हार्दिक पंड्या 5/7
कॅप्टन कोहलीचे दमदार अर्धशतक
दमदार कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले.
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी, शमीला संधी
भारताचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. जायबंदी भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात मोहम्मद शमीला संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू विजय शंकरदेखील दुखापतग्रस्त होता, मात्र तो सामन्याआधी तंदुरुस्त झाल्यामुळे त्याचे संघातील स्थान कायम आहे.