लज्जास्पद : आईच्या कुशीत झोपलेल्या ९ महिन्याच्या बालिकेचे अपहरण करून बलात्काराचा प्रयत्न आणि खून

तेलंगानाच्या वरंगळ येथे एका ९ महिन्याच्या चिमुकलीचे एका नराधमाने अपहरण करुन तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करुन खून केल्याची लज्जास्पद घटना घडली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.
या वृत्तात म्हटले आहे की एक नऊ महिन्याची बालिका आपल्या पालकांसोबत आईच्या कुशीत झोपलेली असताना आरोपीने तिला उचलून तिचे अपहरण केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. सदर बालिका जेव्हा रडू लागली तेव्हा आरोपीने तिच्या ओरडण्याचा आवाज लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून तिचे तोंड दाबले आणि श्वास गुदमरल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला.
दरम्यान दाम्पत्याने आईच्या कुशीत बाळ नसल्याने शोधा शोध सुरू करून पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांच्या तपासात एका व्यक्ती जवळ बाळ होते, त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आणि बाळाला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदर आरोपी त्यांचा शेजारी आहे. आपल्या घराच्या गच्चीवर फिर्यादी दांपत्य झोपले होते.