सामाजिक समतेवर भाष्य करणाऱ्या आयुष्मान खुरानाच्या “आर्टिकल १५” सिनेमाला करणी आणि परशुराम सेनेचा विरोध कशासाठी ?

आयुष्मान खुराना सध्या त्याच्या आगामी आर्टिकल १५ सिनेमामुळे चर्चेत आहे. आर्टिकल १५ चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून आयुष्मानच्या या सिनेमाची चर्चा आहे. सिनेमात समतेच्या अधिकाराबद्दल भाष्य करण्यात आलं आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित या सिनेमात उत्तर प्रदेशच्या बदायूं येथील एका घटनेवर भाष्य केलं आहे. पण आता हा सिनेमा वादात अडकला आहे.सिनेमात आयुष्मान खुराना एका पोलीस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. दोन मुलींच्या मृत्यूचं गुढ उकलण्याचा प्रयत्न करत असतो. २०१४ मध्ये बदायूं येथे दोन मुलींवर बलात्कार करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. याच विषयावर सिनेमाची कथा भाष्य करणार आहे. मात्र या सिनेमाला करणी सेना आणि परशुराम सेनेकडून विरोध होताना दिसत आहे. या दोन्ही सेनेने प्रदर्शन रोकण्याची धमकी देत सिनेमात ब्राह्मण समाजाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप केला आहे.