डॉ . नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण : संजीव पुनाळेकरला २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले सनातन संस्थेचा वकील अॅड. संजीव पुनाळेकरला पुणे येथील सत्र न्यायालयाने २३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. पुनाळेकरला आधी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. सीबीआयने बुधवारी चौकशीसाठी पुनाळेकरला कोठडी द्यावी, अशी मागणी कोर्टात केली होती. ही मागणी कोर्टाने मान्य केली. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याच्या आरोपावरून अॅड. पुनाळेकरला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, पुनाळेकरच्यावतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला असून त्यावर सुनावणी सुरू आहे.