धक्कादायक : ” तू मेरा नही होगा तो किसीका भी नही होगा ” म्हणून दुसरीसोबत लग्न करण्यास निघालेल्या प्रियकरावर प्रेयसीचा अॅसिड हल्ला !!

उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ज्या तरुणावर अनेक वर्ष प्रेम केलं तो दुसऱ्याच मुलीशी लग्न करतोय हे समजल्याने त्याच्यावर जाम चिडलेल्या तरुणीने जणू ” तू मेरा नही होगा तो किसीका भी नही होगा ” असे मनोमन म्हणत आपल्या प्रियकरावर अॅसीड हल्ला केला. या हल्ल्यात तो तरुण जखमी झाला. या तरुणाचे दुसऱ्याच दिवशी लग्न होते मात्र या हल्ल्यामुळे त्याच्या लग्नात आता विघ्न आले आहे . त्या तरुणीला पोलिसांनी अटक केली असून रागाच्या भरात आपण हा हल्ला केल्याची कबुली तिने पोलिसांना दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उमेश असे त्या पीडित तरुणाचे नाव आहे. या तरुणाचे लग्न ठरले होते . लग्नाची सर्व तयारी झाली होती. मात्र आदल्याच दिवशी झोपलेल्या उमेशवर शेजारी राहणाऱ्या एका तरुणीने अॅसीड फेकले . त्यात तो जखमी झाला. उमेश आणि त्या तरुणीचे अनेक वर्ष प्रेम प्रकरण सुरू होते . त्यांनी लग्नाच्या आणाभाकाही घेतल्या होत्या. मात्र उमेशच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या लग्नाला मान्यता मिळाली नाही.
दरम्यान उमेशच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न नात्यातल्या दुसऱ्याच एका मुलीशी जमवलं आणि लग्नाची तारिखही काढली. उमेशही आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने त्या तरुणीला आपण आता वेगळ्या मार्गाने जाऊ असं सांगत तिच्यापासून तो सहजपणे दूर झाला. मात्र उमेशचं असं दूर होणं ती सहन करू शकली नाही आणि तिने हल्ल्याची योजना बनवली. ” तू मेरा नही होगा तो किसीका भी नही होगा ” अशा मनस्थितीत येऊन कुठल्याही परिस्थितीत त्याचं लग्न होऊच द्यायचं नाही अशी योजना तिने तयार केली . त्यानुसार एका दुकानातून तिने अॅसिड आणून झोपलेल्या उमेशवर अख्खी बॉटलच फेकून मारली. उमेशला दवाखाण्यात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.