एकतर्फी प्रेमातून खोडसाळपणा, दादरमधील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. ‘दुश्मन पर फतेह’, JIHAD-UL-AKBAR-TAEGET DADAR SHIDHI VINAYAYAK “BOOM”’, असा मेसेज देऊन दादरमधील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे मोठी खळवळ उडाली होती. मात्र, ही धमकी नसल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने हे खोडसाळपणा केला आहे.
ठाण्याच्या विवियाना मॉलमधील बाथरूममध्ये सोमवारी सकाळी धमकीचा मेसेज आढळला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. ठाणे पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित तरुणाला ताब्यात घेतले होते. हा विक्रोळीचा आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून हा खोडसाळपणा केला आहे. त्याला एका मुलीला त्रास द्यायचा होता, म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तरुणाने धमकीचा मेसेज लिहून त्याखाली मुलीचा मोबाइल नंबर लिहिला होता.